Bhima River Flood: भीमा नदीच्या पुराचे पाणी पुलावर; नानगाव-वडगाव रासाई मार्ग बंद

नदीपात्रातील पाणी वाढल्याने पुलावर बॅरिकेड्स; नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
Bhima River Flood
Bhima River FloodPudhari
Published on
Updated on

नानगाव: दौंड तालुक्यातील नानगाव व शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई या दोन गावांना व दोन तालुक्यांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने दि.६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून दि‌.७ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास देखील या पुलावरून पाणी वाहत असल्याची वस्तुस्थिती पहावयास मिळत आहे.त्यामळे पुलावरील पाणी कमी होत नाही तोपर्यंत हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Bhima River Flood
Maharashtra Land Records Online: ई-मोजणी 2.0चा दावा फोल? पुण्यात मोजणीची ‘क’ प्रत मिळवण्यासाठी नागरिकांची कार्यालयात धाव

गेली आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात व डोंगर भागात पावसाला सुरुवात झाली असल्याने खाली वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे.डोंगरभागातील पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर नद्यांच्या पाणीपातळीत उतार चढ होत असतो.मात्र गेली दोन दिवसांपासून नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येत आहे.वाढलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील बंधारे व काही पुल पाण्याखाली गेले आहेत.

Bhima River Flood
Khadakwasla Dam Water Level: पुण्यात मुसळधार पाऊस; खडकवासला धरणसाखळीत २४ तासांत २.८० टीएमसी पाण्याची भर

नानगाव (ता.दौंड) येथील नदीवरील पुलावरून दि.६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाणी वाहु लागल्यामुळे संबंधित विभागाने हा पुलाच्या कडेला बॅरीकेट लाऊन पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.दि.७ रोजी देखील सकाळी पुलावर पाणी वाहत असल्याने सध्यातरी हा पुल वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आला आहे.

Bhima River Flood
Pune School Holiday: रेड अलर्टमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळांना आज सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने नदीकाठच्या शेतमालांचे नुकसान झाले असून नदीकाठचे बरेचसे क्षेत्र सध्या पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर काही काळ असाच राहिला तर नदीपात्रातील पाण्याची पातळी अशीच वाढेल व पुलावरील वाहतूक काही काळ बंद राहील अशी परिस्थिती दिसून येत आहे ‌‌.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news