भीषण आग शांत झाली, जीवही वाचला, आता संसार उभा करण्याचे आव्हान

सुदैवाने वेळीच घराबाहेर पडल्याने धामणगाव येथील आगीच्या घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही
भीषण आग शांत झाली, जीवही वाचला, आता संसार उभा करण्याचे आव्हान
Published on
Updated on

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे शनिवारी (दि.2 मे) लागलेली भीषण आग रात्री उशिरा शांत झाली. गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. आता रविवारी सकाळपासून राखीच्या ढिगाऱ्यात गमावलेले साहित्य शोधताना गावकरी, जीव बचावला, आता संसार उभा करण्याचे आव्हान....असल्याच्या चिंतेत आहेत.

भीषण आग शांत झाली, जीवही वाचला, आता संसार उभा करण्याचे आव्हान
Chandrapur Fire News : वरोरा हादरले! रवी कमल जिनिंगला भीषण आग; १० कोटींचे पांढरे सोने खाक

सुदैवाने वेळीच घराबाहेर पडल्याने धामणगाव येथील आगीच्या घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 5-6 गुरे आणि शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.सुमारे 25 घरे भस्मसात झाली आहेत. शेतातून वणवा गावात, अनर्थ टळला,शाळेत निवारा, काही गेले नातेवाईकांकडे ही आग लगतच्या शेतांतून कचरा पेटविल्यानंतर पसरल्याचे दिसून येते. अग्निशमन विभाग, पोलीस पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली; त्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांची सुटका केली आणि गॅस सिलिंडर्स सुरक्षितपणे बाहेर काढले, ज्यामुळे पुढील स्फोट आणि अनर्थ टळला.

भीषण आग शांत झाली, जीवही वाचला, आता संसार उभा करण्याचे आव्हान
Shendra MIDC fire : शेंद्रा एमआयडीसीत प्लास्टिक दाणा बनवणाऱ्या कंपनीत आग

नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील तालुका ठिकाणांवरून आलेल्या अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी (टेंडर्स) आगीवर रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळवले. महसूल विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या समन्वयाने, बाधित कुटुंबांच्या निवासाची व्यवस्था स्थानिक शाळेत करण्यात आली आहे. बाधित कुटुंबांना त्यांच्या जवळच राहणाऱ्या नातेवाईकांकडे जाण्यास मदत करण्यासाठी, चार पोलीस बसेस धामणगाव येथे पाठवण्यात आल्या असल्याची माहिती हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news