Nagargaon Road Accident: नागरगावमध्ये भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शिरूर तालुक्यात मध्यरात्रीचा अपघात; कोल्हापूरहून परतताना काळे कुटुंबावर दुर्दैवी आघात
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

मांडवगण फराटा: शिरूर तालुक्यातील नागरगाव (ता. शिरूर) येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Accident
Sharad Pawar Health Update: शरद पवार पूर्णपणे बरे; रुबी हॉल क्लिनिकमधून आज डिस्चार्ज

प्राथमिक माहितीनुसार, निमोणे येथील पवन राजहंस काळे, वंदना पवन काळे, आराध्या पवन काळे आणि बाळासाहेब प्रकाश नागवडे हे चौघे कोल्हापूर येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना नागरगाव परिसरात हा अपघात झाला.

Accident
Valentine Special Disabled Couple Inspiration: दिव्यांगत्वावर मात करत हरिदास–संगीताने उभारले आनंदी संसार

या अपघातात पवन काळे, त्यांची मुलगी आराध्या काळे आणि बाळासाहेब प्रकाश नागवडे यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. वंदना पवन काळे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची वार्ता समजताच शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news