

पुणे : नगर रस्त्यावर थांबलेल्या दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील आरोपी शिवलिंग म्हेत्रे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.
त्याने ॲड. मुकुल महिंद्रकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणातील, जखमीस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेले आहे. आरोपीच्या साथीदारास जामीन मंजूर झाला असल्याने म्हेत्रे यासही जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. महिंद्रकर यांनी केला.
न्यायालयाने तो ग्राह्य धरत विविध अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला. 11 सप्टेंबरला पहाटे घडलेल्या घटनेप्रकरणी आरोपीविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.