राज्यातील ‘या’ सात उत्पादनांच्या जीआय नोंदणीत नाबार्डचे सहकार्य

राज्यातील ‘या’ सात उत्पादनांच्या जीआय नोंदणीत नाबार्डचे सहकार्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सात उत्पादनांना केंद्र सरकारचे भौगोलिक मानांकन तथा जीआय मिळण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने विशेषतः या प्रक्रियेतील नोंदणीसाठी सहकार्य केलेले आहे. त्यासाठी या अद्वितीय उत्पादनांची वैशिष्ट्ये जतन करण्यासाठी नाबार्डने वाराणसीमधील मानव कल्याण संघाची मदत घेतल्याची माहिती कळविण्यात आली आहे. त्याद्वारे महाराष्ट्रातील सात स्वदेशी उपादनांना जीआय नोंदणीसाठी नाबार्डकडून मदत करण्यात आली आहे.

या सात जीआय मानांकन उत्पादनामध्ये वसमत हळदी (हिंगोली), नंदुरबार आमचूर, नंदुरबार मिर्ची, हुपरी सिल्व्हर क्राफ्ट (कोल्हापूर), मिरज तानपुरा (सांगली), मिरज सतार (सांगली) आणि सावंतवाडी लाकडीक्राफ्ट (सिंधुदुर्ग) ही महाराष्ट्रातील अद्वितीय उत्पादने आहेत.
भौगोलिक मानांकनप्राप्त उत्पादने ही त्या- त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील असतात. ज्यांचे एखाद्या विशिष्ट स्थानाचे गुण, प्रतिष्ठा किंवा वैशिष्ट्यांचा अंतर्भाव त्या वस्तूंमध्ये राहतो आणि त्याचे वेगळेपण जीआयमुळे अधोरेखित होते. खाद्यपदार्थ म्हणजे वसमत हळदी, सुका आंबा आणि मिरची त्याचा अद्वितीय रंग, सुगंध आणि चव या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे आहे. इतर चार उत्पादन क्षेत्रे ग्रामीण कारागिरांनी बनवलेल्या या पारंपरिक वस्तू असल्याचेही नाबार्डकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news