

पुणे : जनता वसाहत परिसरातून जाणाऱ्या उजवा मुठा कालव्यात 'थार' कार पडल्याची घटना बुधवारी (दि.10) सव्वादोनच्या सुमारास घडली.
सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या चारचाकीचे मागील बाजूने नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, चालक ही थार मागे घेत होता, त्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी कॅनॉलमध्ये पाण्याची पातळी खूपच कमी होती.
त्यामुळे पडलेली थार वाहून गेली नाही. माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत, चालकाला बाहेर काढले. तत्काळ क्रेन बोलावून कालव्यात पडलेल्या या थार कारला बाहेर काढण्यात आले.