स्पर्धा अन् बदनामीच्या कारणातून खून; बेल्हेच्या संचालकाच्या खुनाचे रहस्य उलगडले

स्पर्धा अन् बदनामीच्या कारणातून खून; बेल्हेच्या संचालकाच्या खुनाचे रहस्य उलगडले
Published on: 
Updated on: 

नारायणगाव(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : बेल्हे जवळील तांबेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे यांचा खून करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व आळेफाटा पोलिस यांनी संयुक्तरीत्या कामगिरी करत 24 तासांच्या आत पकडण्यात यश मिळवले. व्यावसायिक स्पर्धा आणि बदनामीच्या कारणातून खून करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे
अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

पांडुरंग जिजाभाऊ तांबे (वय 39, रा. तांबेवाडी बेल्हे, ता. जुन्नर) व महेश गोरखनाथ कसाळ (वय 30, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असून संतोष खंडू तांबे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. संतोष तांबे यांच्या फिर्यादीनुसार दि. 5 एप्रिल रोजी रात्री 7.30 चे सुमारास त्यांचा चुलत भाऊ किशोर कोंडिभाऊ तांबे (40, रा. तांबेवाडी, ता. जुन्नर) हा शेतात जातो असे सांगून निघून गेला; मात्र तो परत आला नाही. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांनी गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान पांडुरंग तांबे व महेश कसाळ यांनी हा खून केल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी व्यवसायातील प्रतिस्पर्धा तसेच बदनामी केल्याचा राग मनात ठेवून कट केला. त्याअंतर्गत किशोर तांबे याला दारू पाजून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून करून तो मृतदेह मुरलीधर पिंगळे यांच्या विहिरीत टाकल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली वॅगन आर कार जप्त केली. या गुन्ह्याचा तपास आळेफाटाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे नियंत्रणाखाली आळेफाटाचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरिक्षक सुनील बडगुजर व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक महादेव शेलार, पोलिस हवालदार राजु मोमीन, दिपक साबळे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, पोलिस नाईक संदिप वारे, पोलिस जवान अक्षय नवले, दगडु विरकर, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, हनुमंत ढोबळे, नवीन अरगडे, श्वान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पवार, अशोक लोखंडे व श्वान दुर्गा यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news