पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील लसी संपल्या, केंद्रेही बंद

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील लसी संपल्या, केंद्रेही बंद

पुणे, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स लसींचा साठा उपलब्ध नाही. कोव्हॅक्सिन लसीचे 800 ते 1000 डोस मुदतबाह्य झाले. त्यामुळे शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये 1 एप्रिलपासून लस उपलब्ध झालेली नाही.

गेल्या आठ दिवसांपासून
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता आहे आणि महापालिकेकडे लसी उपलब्ध नाहीत. लसींच्या या कोंडीत कोरोनाशी लढा कसा द्यायचा, अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरात आतापर्यंत 27 लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला होता. यामध्ये केवळ कोव्हॅक्सिन लसींचा समावेश होता. कोव्हिशिल्ड अथवा कॉर्बेव्हॅक्स घेऊ इच्छिणार्‍या नागरिकांना लसीकरणापासून वंचित रहावे लागले. याचा परिणाम 12 ते 14 वर्षे वयोगटातील लसीकरणावर आणि 18 वर्षे वयापुढील नागरिकांच्या बुस्टर डोसवर झाला. आता पुढील लसीकरणासाठी पुणेकरांना किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे.

शहरातील लसीकरणाचा टक्का
वयोगट           पहिला डोस       दुसरा डोस         बुस्टर डोस
12 ते 14             42%               27%                     0
15 ते 18             69%              47%                      0
18 पुढील         100%               94%                     17 %

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news