Pune News: महापालिकेच्या विकासकामांवर आता तिसऱ्या पक्षाची नजर; निकृष्ट कामांवर अभियंत्यांवर कारवाई

थर्ड पार्टी गुणवत्ता तपासणी, प्रत्येक टप्प्याचे जिओ-टॅग छायाचित्रण आणि अंतिम बिलापूर्वी दक्षता विभागाची तपासणी बंधनकारक
PMC
PMCPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी होत असताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर भूमिका घेत प्रशासनाला जबाबदारीच्या कचाट्यात आणले आहे.

यापुढे प्रत्येक विकासकामाची 'थर्ड पार्टी'कडून गुणवत्ता तपासणी, कामाच्या प्रत्येक टप्प्याचे जिओ-टॅग छायाचित्रण आणि अंतिम बिलापूर्वी दक्षता विभागाची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.

काम निकृष्ट आढळल्यास किंवा मोजमापात अनियमितता झाल्यास संबंधित अभियंत्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.

महापालिकेच्या विकासकामात नागरिक आणि विविध संस्थांकडून सातत्याने तक्रारी येत असतात. तसेच विकासकामे निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण होत नसल्याची सातत्याने ओरड असते. आता या सर्व तक्रारींची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांना कडक निर्देश देण्यात आले आहेत.

PMC
Market committee supervision fee: बाजार समित्यांच्या सचिव केडरचा मार्ग मोकळा; निधी जमा करण्यास मंजुरी

आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्येक विकासकामाची बाह्य संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे. यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया शहर अभियंता कार्यालयाने तातडीने सुरू करावी. काम सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना आणि पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंत्यांना अक्षांश-रेखांशासह (जिओ-टॅग) छायाचित्रे नोंदवावी लागणार आहेत.

प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासणे, अचूक मोजमाप घेणे आणि त्याची मोजमाप पुस्तिकेत नोंद करणे ही शंभर टक्के जबाबदारी संबंधित अभियंत्यांवर निश्चित करण्यात आली आहे. तर केवळ कनिष्ठ अभियंत्यांवर जबाबदारी टाकून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोकळे होता येणार नाही.

PMC
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी झाल्याने जखमी मंदारने पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदविला जबाब

उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंत्यांनाही कामांची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्तेची खातरजमा करावी लागणार आहे. अतिरिक्त आयुक्तांनी त्यांच्या अखत्यारीतील काही कामांची निवड करून तपासणी करावी लागणार असून आहे.

विशेष म्हणजे, कामाचे अंतिम बिल अदा करण्यापूर्वी दक्षता विभागाची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. वित्तीय मान्यता, कामाचा कालावधी, विमा आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचीही पडताळणी त्यात करण्यात येणार आहे.

कामाच्या गुणवत्तेत त्रुटी, मोजमापातील अनियमितता अथवा आदेशांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

...तर संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

विकासकामांच्या गुणवत्तेबाबत आयुक्तांनी आता कनिष्ठ अभियंत्यापासून वरिष्ठ अभियत्यांपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार आता कामाच्या गुणवत्तेत त्रुटी, पुनरावृत्ती, मोजमापातील अनियमितता अथवा दिलेल्या आदेशाचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंग़ाची कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.