Mundhwa Attempt To Murder Case: प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला; मुंढव्यात चौघांना अटक

धारधार शस्त्राने वार करून झाडाला टांगण्याचा प्रयत्न; प्रवीण माने गंभीर जखमी
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

पुणे: विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या वादात चौघांनी एका तरुणावर धारधार शस्त्राने वार करून, त्याला झाडाला टांगून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत प्रवीण धनंजय माने (वय 24, रा. श्रीमाननगर, शेवाळेवाडी फाटा, मांजरी) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रवीण माने हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Murder Case
Pune Nagpur Special Train: लाँग विकेंडला पुण्याहून नागपूरला जाताय? रेल्वे चालवणार विशेष ट्रेन, माहिती वाचा

तर महेश सोमनाथ सरोदे (वय 35) त्याचे साथीदार आदित्य शरद भोसले (वय 22), आदित्य संजय रोकडे (वय 21), कैलास संतोष ओव्हाळ (वय 26, रा. सर्व भीमनगर मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा येथील भीमनगरमधील बारामती ॲग््राो चिकन सेंटरसमोर 19 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता घडली.

Murder Case
Pimpri Chinchwad PC Shield App: ‘पीसी शील्ड’ ॲपमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये 1,585 सराईत गुन्हेगारांचे मॅपिंग पूर्ण

याबाबत मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी सांगितले की, प्रवीण माने आणि महेश सरोदे हे दोघेही ड्रायव्हर म्हणून काम करतात. प्रवीण माने यांचे एका विवाहित तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. त्यावरून महेश सरोदे याने मनात राग धरून प्रवीण माने याला फोन करून भीमनगर येथे बोलावून घेतले.

Murder Case
Maharashtra RKVY Grant: आरकेव्हीवायअंतर्गत महाराष्ट्राला 2026-27 साठी 1,256 कोटींचे अनुदान मंजूर

प्रवीण माने हा तेथे आल्यावर महेश सरोदे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यात, उजव्या गुडघ्यावर, दोन्ही हातावर, पाठीवर धारधार हत्याराने वार केले. त्यांचे कपडे पेटवून दिले. तसेच ‌’तू पोलिसांकडे तक्रार दिली तर तुझी गेम वाजवू,‌’ अशी धमकी देऊन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Murder Case
MPed MEd CET 2026: एमपीएड–एमएड सीईटी 2026 नोंदणीस 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंढवा पोलिसांनी प्रथम महेश सरोदे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याच्या इतर तीन साथीदारांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले तपास करीत आहेत.

प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसानी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

स्मिता वासनिक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news