प्रो पंजा लीग मध्ये पुनीत बालन ग्रुपच्या मुंबई मसल संघाची एण्ट्री, पुनीत बालन यांनी घेतली संघाची मालकी

प्रो पंजा लीग मध्ये पुनीत बालन ग्रुपच्या मुंबई मसल संघाची एण्ट्री, पुनीत बालन यांनी घेतली संघाची मालकी
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आशियातील सर्वात मोठ्या आर्म-रेसलिंग प्रमोशन प्रो पंजा लीगच्या बहुप्रतिक्षित पहिल्या सीझनमध्ये आता मुंबई मसल हा संघ सहभागी होणार आहे. या संघाची मालकी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी घेतली आहे. यनिमित्ताने पुनीत बालन ग्रुपने आणखी एका भारतीय खेळाला प्रोत्साहन दिले आहे.

पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, बॉलीवूड अभिनेते आणि प्रो पंजा लीगचे सह मालक परवीन दबास आणि प्रीती झांगियानी यांच्यात नुकताच या संबंधीचा करार झाला. आर्म-कुस्तीच्या चाहत्यांचे डोळे लागलेली ही स्पर्धा 28 जुलै ते 13 ऑगस्ट 2023 या 17 दिवसांच्या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेत सहा संघांमध्ये विभागलेले 180 आर्म कुस्तीपटू सहभागी होतील. प्रो पंजा लीगमध्ये पुरुष, महिला आणि विशेष अपंग कुस्तीपटूंसाठी श्रेणी असणार आहेत. देशभरातील आर्म-रेसलिंग चाहत्यांसाठी ही स्पर्धा ही एक पर्वणी ठरणार आहे. सोनी स्पोर्ट्स टेन 1 आणि सोनी स्पोर्ट्स टेन 1 एचडी चॅनेलवर क्रीडा रसिकांना ही स्पर्धा पाहता येणार आहे.

दरम्यान क्रीडा क्षेत्रात सातत्याने मोठे योगदान देत असलेल्या पुनीत बालन ग्रुपकडून टेबल टेनिस, खो खो, बॅडमिंटन, हॅडबॉल, क्रिकेट अशा विविध खेळांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले जातात. अल्टीमेट खो खो, टेनिस लिग, प्रीमिअर बेडमिंटन लीग, हॅन्डबॉल लीग आणि महाराष्ट्र आयरमन संघ यांचे स्वामित्व पुनीत बालन यांच्याकडे आहे.

केवळ क्रिकेटच नाही तर देशातील सर्वच खेळांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, अशी नेहमीच भूमिका राहिली आहे. पंजा हा प्रत्येकाच्या बालपणाचा एक प्रमुख भाग आहे आणि स्पर्धात्मक स्वरुपात त्याची भरभराट होत असल्याचे पाहणे खरोखरच उल्लेखनीय आहे. प्रो पंजा लीग सुलभतेने देशामध्ये त्याची वाढ होण्याबरोबरच मुंबई मसल लीगमध्ये सामील झाल्याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news