Pune Rains : मुळशी धरणातून विसर्ग सुरू

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Mulshi  River
मुळशी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. Pudhari News Network

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुळशी धरण परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून गुरुवारी (दि.२५) दुपारी एक वाजता २५०० क्युसेक वेगाने मुळशी धरणातून मुळा नदीत नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरणात येणा-या पावसाच्या पाण्याचा प्रमाण वाढत गेल्यास त्यानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल, अशी माहिती मुळशी धरण व्यवस्थापक बसवराज मुन्नोळी यांनी दिली. (Pune Rains)

Mulshi  River
पुणे : हाँटेलवर दरड कोसळली, ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद

ताम्हिणी परिसरात मागील चोवीस तासांत ५५६ मिलीमीटर पाऊस

ताम्हिणी परिसरात गेल्या चोवीस तासांत ५५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ही शंभर वर्षांतील अत्यंत दुर्मिळ नोंदीपैकी एक नोंद आहे. ताम्हिणी बरोबरच धरणाच्या इतर भागातही पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. या विक्रमी पावसामुळे गेल्या चोवीस तासांत मुळशी धरणात ३ टीएमसी पाणीसाठा आल्याने एकूण १४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरण ८० टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी मुळा नदीत विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. (Pune Rains)

Mulshi  River
Pune Rain Updates | पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट, आज शाळांना सुट्टी जाहीर

मुळशी धरणात चोवीस तासांत ३ टीएमसी पाणी

मुळशी धरण भागातील डोंगर, दरी, ओहोळी, ओढे, नाल्यांमधून येणारे पाणी धरणात जमा होत आहे. धरणात पाणी येण्याचे विस्तीर्ण पसरलेले स्त्रोत मोठया संख्येने असल्याने जोराच्या पावसात मुळशी धरणातील पाण्याचा साठा वेगाने वाढतो. गेले चार-पाच दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी अत्यंत वेगाने वाढत आहे. बुधवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे गेल्या अवघ्या चोवीस तासांत सुमारे ३ टीएमसी पाणी जमा झाले आहे. (Pune Rains)

Mulshi  River
निपाणी : वेदगंगेची पाणीपातळी वाढल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर पोलिस बंदोबस्त

पाऊस मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे :

ताम्हिणी ५५६ (४६३०), दावडी ३६७ (३५४९), आंबवणे ४४० (३३००), शिरगाव ४८४ (३२८१), मुळशी ३०५ (१८६६), माले ३०२ (१६८०),

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news