MPSC Age Limit Relaxation: एमपीएससी परीक्षांसाठी वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता

गट-ब व गट-क पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा
MPSC Exam
MPSCPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा झालेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळणार असून, त्यांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. ज्या स्पर्धा परीक्षार्थींची वयोमर्यादा संपुष्टात आली होती, अशा सर्व उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MPSC Exam
Pune Municipal Election Nominations: पुणे महापालिका निवडणूक; दुसऱ्या दिवशीही उमेदवारांचा अर्ज भरण्याकडे पाठ

एक वेळची विशेष बाब म्हणून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या निश्चित केलेल्या कमाल संवर्गाच्या जाहिरातींस अनुसरून वयोमर्यादेमध्ये एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे.

MPSC Exam
Daund Pune Railway Passengers: दौंड–पुणे रेल्वेमार्गावरील प्रवाशांची दयनीय अवस्था; मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

राज्यात मागास वर्गासाठी राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी शासनामार्फत पदसंखेच्या अनुषंगाने आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आली होती. त्यानुसार एमपीएससीने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या.

MPSC Exam
Water Conservation Initiative: शिरूर तालुक्यात ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप

उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 6 जानेवारी ही अंतिम मुदत आहे.

MPSC Exam
Madhardev Ghat: मांढरदेव–कांजळे काळूबाई यात्रेसाठी भोर प्रशासन सज्ज; मांढरदेव घाट प्रवासासाठी सुरक्षित

दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news