

Monsoon Updates
पुणे : मान्सून यंदा अतिशय वेगाने प्रगती करीत आहे. मान्सून शनिवारी 17 मे रोजी मालदीवसह, श्रीलंकेत दाखल झाला. हवामान शास्त्रज्ञांच्या मते 21 मे रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होईल, अशी स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे केरळ आणि कर्नाटक राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
यंदा हवेचे दाब अगदी वेळेवर अनुकुल झाल्याने मान्सून फार काळ न अडखळता वेगाने प्रगती करीत आहे. 13 मे रोजी तो अंदामानात आला तेथून तो 15 मे रोजी बंगालच्या उपसागरात आला तर 17 मे रोजी श्रीलंकेत पोहोचला आहे. त्यामुळे केरळ आणि कर्नाटकात चक्रीय स्थिती तयार झाली असून त्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी सात दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.