मान्सूनच ठरलं! राज्यात ‘या’ तारखेपर्यंत मान्सून दाखल होणार..

मान्सूनच ठरलं! राज्यात ‘या’ तारखेपर्यंत मान्सून दाखल होणार..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनुकूल स्थितीमुळे यंदा मान्सून महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, तळकोकणात 7 जूनलाच मान्सून धडक मारणार आहे. अनुकूल स्थितीमुळे यंदा मान्सून बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांबर 19 मे रोजी पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, मान्सून दोन दिवस आधीच दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

कारण, ला-निना आणि हिंदी महासागरातील आयओडी सध्या चांगल्याप्रकारे सक्रिय झाला आहे. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीसाठी या दोन्ही स्थिती अनुकूल आहेत, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मान्सून 7 जून रोजी तळकोकणात, तर 10 आणि 12 जूनपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई तसेच पुणे आणि आसपासच्या भागांत पोहोचण्याची जास्त शक्यता आहे. हवामान विभागाने अभ्यासलेल्या मॉडेलनुसार, मान्सूनच्या मॉडेलनुसार हा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news