खडकवासला :रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत, वरसगाव खोर्यात बुधवारी (दि. 23) सायंकाळपासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक मंदगतीने वाढत आहे. 29.15 टीएमसी साठवणक्षमतेच्या चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजता 23.43 टक्के म्हणजे 80.39 टक्के साठा झाला होता. पावसाच्या रिमझिमीने धरणसाखळीची शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू झाली आहे. (Pune Latest News)
सर्वांत मोठ्या वरसगाव धरणात 85.19 टक्के तर पानशेतमध्ये 81.48 टक्के साठा झाला आहे. खडकवासला धरणसाखळीच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर- फुटाणे म्हणाल्या, बुधवारी दुपारपासून धरणक्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली नाही. मात्र, मंदगतीने थोडीफार आवक सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याची आवक वाढणार आहे.
29.15 टीएमसी
बुधवारचा पाणीसाठा
23.43 टीएमसी
(80.39 टक्के)
चारही धरणक्षेत्रात सकाळी दाट धुके पडले होते. रिमझिमीनंतर दुपारपर्यंत पावसाने उघडीप घेतली. नंतर सायंकाळी पाचनंतर रिमझिम सुरू झाली. गेल्या 24 तासांत धरणसाखळीत 0.29 टीएमसी पाण्याची भर पडली. मंगळवारी (दि.22) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 23.14 टीएमसी पाणीसाठा होता.