पिंपरी : शहरातील तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का ; वर्षभरात 18 गुन्ह्यांत 129 आरोपींवर कारवाई

file photo
file photo
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरात वाढती गुन्हेगारी तसेच नुकतेच भरदिवसा पिंपरी परिसरात तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आयुक्तलयाच्या कार्यक्षेत्रातील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत गुरुवारी कारवाई करण्यात आली. वर्षभरात 18 गुन्ह्यांत 129 आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम ऊर्फ पप्पू दत्तात्रय कड (वय 22, रा. चाकण) व त्याच्या दोन साथीदारांवर, कुणाल ऊर्फ बाबा धीरज ठाकूर (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) व त्याच्या तेरा साथीदारांवर, करणसिंग राजपूतसिंग दुधाणी (वय 25, रा. हडपसर) यांच्या एका साथीदारावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सत्यम ऊर्फ पप्पू याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, शासकीय कर्मचार्‍यावर हल्ला, असे 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, कुणाल ऊर्फ बाबा याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, असे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. करणसिंग याच्यावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी, पिस्तूल जवळ बाळगणे असे गंभीर आठ गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीत दाखल आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news