Mohammadwadi Power Cut: महंमदवाडीत वीजेचा ‘लपंडाव’; वारंवार खंडित पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

१५ ते २० दिवसांपासून तांत्रिक बिघाडाचे कारण; लघुउद्योग, व्यावसायिकांसह वारकरी भाविकांनाही फटका
power cut
power cutPudhari
Published on
Updated on

कोंढवा: महंमदवाडी परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. केबल बिघाड, महापालिकेच्या कामामुळे केबल तुटणे, तांत्रिक अडचणी अशी विविध कारणे देत महावितरणकडून वीजपुरवठा वारंवार बंद केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सततच्या व्यत्ययाचा फटका नागरिकांसह लघुउद्योग, व्यावसायिक आणि वारकरी भाविकांनाही बसला आहे.

power cut
Fursungi Road Potholes: फुरसुंगीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था; हडपसर-सासवड मार्गावर वाहनचालकांची कसरत

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात अनेकदा तासन्‌तास, तर काही वेळा दिवसभर वीजपुरवठा खंडित राहतो. तक्रारी करूनही त्वरित दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. केबल दुरुस्तीसाठी किंवा जॉइंट जोडण्यासाठी तब्बल १२ ते १४ तास लागतात, असा आरोपही नागरिकांनी केला.

power cut
Maharashtra School Minority Status: व्यवस्थापन बदलले म्हणून शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळणार नाही; राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय

वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे लहान-मोठ्या उद्योगांचे कामकाज विस्कळीत होत असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पाऊस, वादळी वारे किंवा नैसर्गिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होणे समजू शकते; मात्र, वातावरण सुरळीत असतानाही रोजच तांत्रिक कारणांमुळे वीज जाणे हे महावितरणच्या नियोजनातील त्रुटी दर्शवित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महावितरणच्या कारभारत प्रकाश पडणार तरी कधी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

power cut
Pune FC Road Encroachment: एफसी रोडवर पुन्हा अतिक्रमणाचा बाजार; पदपथ पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी? नागरिकांचा सवाल

या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास महावितरणविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. महावितरणने या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

power cut
Pune Municipal Recruitment Fraud: पुणे महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने ४५ लाखांचा गंडा; बनावट नियुक्तिपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

वारकऱ्यांची झाली होती गैरसोय

आषाढी वारीदरम्यान महंमदवाडीत मुक्कामी असलेल्या वारकरी भाविकांनाही या समस्येचा सामना करावा लागला. वीज नसल्यामुळे त्यांना मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करावे लागले, तर भजन-कीर्तनही अंधारातच करावे लागल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news