Fursungi Road Potholes: फुरसुंगीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था; हडपसर-सासवड मार्गावर वाहनचालकांची कसरत

पावसाच्या पाण्याने खड्डे झाकल्याने अपघाताचा धोका वाढला; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी
Road Potholes
Road PotholesPudhari
Published on
Updated on

फुरसुंगी: हडपसर-सासवड रस्त्यासह फुरसुंगी परिसरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा मोठा फटका बसत असून, किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Road Potholes
Maharashtra School Minority Status: व्यवस्थापन बदलले म्हणून शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळणार नाही; राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय

पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे अचानक वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना या रस्त्यांवरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे सांगितले.

Road Potholes
Pune FC Road Encroachment: एफसी रोडवर पुन्हा अतिक्रमणाचा बाजार; पदपथ पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी? नागरिकांचा सवाल

या रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवून सुरक्षित वाहतुकीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवरील वाहतूक अधिक धोकादायक बनली असून, तातडीने खड्डे बुजवून या रस्तांवी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फुरसुंगी येथील रस्त्यांची लवकरच पाहणी करण्यात येईल. त्यानंतर खड्डे बुजवून या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.

प्रवीण सस्ते, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, फुरसुंगी नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news