राज्यात ’मनरेगा’तून 60 हजार हेक्टरवर फळबाग लागवड

राज्यात ’मनरेगा’तून 60 हजार हेक्टरवर फळबाग लागवड
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) 2023-24 मध्ये सुमारे 60 हजार हेक्टरवर फळबाग, फुलपीक, वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्तिच करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हानिहाय लक्ष्यांक देण्यात आला असून, एकूण 9 हजार 53 कृषी सहायकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांनी दिली. देशात महाराष्ट्रामध्ये तीन वर्षे उच्चांकी फळबाग लागवड झाली आहे.

कृषी विभागासह मनरेगातील संपूर्ण यंत्रणेमुळे उच्चांकी फळबाग लागवड झाली आहे. मनरेगांतर्गत त्यादृष्टीने एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यांचे नियोजनही निश्चित करून क्षेत्रीय स्तरावर पाठविण्यात आले आहे. फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून शाश्वत रोजगारनिर्मतिी करणे, पूरक व्यवसायात वाढ करून उत्पादन वाढविणे, जून ते डिसेंबर या कालावधीत लागवड करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. योजनेतून लाभार्थी शेतकर्‍यांना त्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर फळबाग लागवड करता येईल. लाभार्थी शेतकर्‍यांना पाच गुंठे ते दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत फळझाड लागवड करता येईल.

जिल्हानिहाय उद्दिष्ट (हेक्टरमध्ये)

ठाणे 1500, पालघर 2700, रायगड 2400, रत्नागिरी 4000, सिंधुदुर्ग 3400, नाशिक 4000, धुळे 1000, नंदुरबार 2500, जळगाव 2500, अहमदनगर 3000, पुणे 3000, सोलापूर 2700, सातारा 1200, सांगली 1600, कोल्हापूर 600, औरंगाबाद 1000, जालना 1800, बीड 500, लातूर 1300, उस्मानाबाद 800, नांदेड 700, परभणी 1500, हिंगोली 600. दरम्यान, अमरावती विभागात 8200 आणि नागपूर विभागात 7500 हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे मोते यांनी सांगितले.

कोणत्या पिकांची लागवड करता येईल…

आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर कलमे, द्राक्ष, ड्रॅगनफ ट, अ‍ॅव्हॅकेडी, केळी, सुपारी, साग, गिरिपुष्प, कडुननिंब, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कढीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पती. फुलपिकांमध्ये गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा. मसाला पिकांमध्ये लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी इत्यादी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news