

खडकवासला : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील 642 कर्मचार्यांना बोगस भरतीप्रकरणी कामावरून कमी करण्यात आले आहे. असे असले तरी यातील नियमित कर्मचार्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी शासनाने योग्य निर्णय घ्यावा, असे साकडे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत राज्य शासनाला घातले आहे. बडतर्फ कर्मचार्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या चौकशीत 23 गावांतील ग्रामपंचायतीचे 642 कर्मचारी बोगस भरती झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे महापालिकेने या कर्मचार्यांना सेवेत सामावून घेतले नाही. प्रशासनाने सरसकट बोगस 642 कर्मचार्यांना बडतर्फ केले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत तापकीर यांनी 23 गावांतील कर्मचार्यांवर होणार्या अन्यायाबाबत औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले. या कर्मचार्यांना न्याय द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. तापकीर म्हणाले, 'महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांतील कर्मचार्यांची भरती बोगस ठरविण्यात आली. त्याचा फटका 642 कर्मचार्यांना बसला आहे. कोणत्याही कर्मचार्यावर अन्याय होणार नाही, यासाठी शासनाने रीतसर भरती झालेल्या कर्मचार्यांना योग्य तो न्याय द्यावा. हा प्रश्न जादा काळ प्रलंबित न ठेवता तातडीने
निर्णय घ्यावा.'