पुणे : एमआयटी इनोव्हेशन कौन्सिल देशात अव्वल

पुणे : एमआयटी इनोव्हेशन कौन्सिल देशात अव्वल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठा'च्या 'इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल'ला (आयआयसी एमआयटी एडीटी) केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईद्वारा 2021-22 या शैक्षणिक वर्षांकरिता उत्कृष्ट कामगिरीसाठी 3.5 स्टार रेटिंग देण्यात आले असून, देशातील खासगी विद्यापीठ वर्गवारीत 13 वे मानांकन मिळाले.

विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती आणि उद्योजकीय कौशल्य रुजविण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईने विद्यापीठीय स्तरावरील कामगिरीचे रेटिंग जाहीर केले. त्याची घोषणा राष्ट्रीय इनोव्हेशन दिवसानिमित्त केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी नुकतीच केली. देशभरात एकूण सहा हजारांहून अधिक आयआयसी संस्था स्थापन करण्यात आल्या असून, त्यापैकी 1,823 आयआयसी संस्थांचे रेटिंग करण्यात आले आहेत. एमएचआरडीने दिलेले कमाल स्टार रेटिंग 3.5 स्टार होते. आयआयसी एमआयटी एडीटी विद्यापीठाला 3.5 स्टार मिळाले आणि देशातील आयआयसीमध्ये शीर्ष 59 वे, तर पश्चिम भारतातील शीर्ष 4 स्थान मिळाले आहे.

डॉ. मंगेश कराड म्हणाले, 'आयआयसीच्या यशाने एमआयटी एडीटी विद्यापीठाची संशोधनातील कार्याची दखल घेण्यात आली. हे यश आमच्या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांसह सेलच्या वर्षभराच्या मेहनतीचे फलित आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनीता मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, आयआयसीचे संयोजक प्रा. डॉ. वीरेंद्र भोजवानी, प्रा. आशिष उंबरकर, प्रा. राजेश सिद्धेश्वर, प्रा. प्रतीक जोशी, प्रा. गणेश केकाण आणि त्यांच्या टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news