Minor Tempo Driver Chase: भरधाव टेम्पोचा थरार! पोलिसांना न जुमानता वेगाने पळविला टेम्पो; तीन-चार वाहनांचे नुकसान

१७ वर्षीय अल्‍पवयीन ताब्यात; अल्पवयीनाकडे वाहन दिल्याप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल होणार
Minor Tempo Driver Chase
Minor Tempo Driver ChasePudhari
Published on
Updated on

पुणे: काळ्या काचा लावलेल्या वाहनांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना न जुमानता भरधाव वेगाने टेम्पो पळविणाऱ्या व रस्‍त्‍यातील वाहनांना घासून नुकसान करत जाणाऱ्या १७ वर्षीय चालकाला वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून अखेर हडपसर येथील १५ नंबर चौकात ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांच्‍या अंगावरही टेम्‍पो घातल्‍याचे सीसीटीव्‍हीमध्ये कैद झाले आहे.

या अपघातात नागरिक बचावल्‍याचे व्हिडीओतून दिसून येत आहे. या पाठलागादरम्यान टेम्पोने तीन ते चार वाहनांना घासल्याने त्यांचे किरकोळ नुकसान झाले. चालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Minor Tempo Driver Chase
PSI Suspension Pune: कॅफेतील तोडफोड पोलिस उपनिरीक्षकाला भोवली

शहरात काळ्या काचा आणि फॅन्सी नंबरप्लेट लावलेल्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वानवडी विभागाच्या पथकाने काळ्या काचा असलेला टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने टेम्पो पळविला. याची माहिती मिळताच वाहतूक शाखेच्या पथकाने वैदूवाडी परिसरात टेम्पो अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबविता पोलिसांना चकवा देत भरधाव वेगाने पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान टेम्पोने तीन ते चार वाहनांना घासल्याने संबंधित वाहनांचे नुकसान झाले.

Minor Tempo Driver Chase
Pune Police News: हवालदाराची भाईगिरी! एपीआयला ठाण्यातच मारहाण

अखेर १५ नंबर चौकात पोलिसांनी टेम्पो अडवून चालकाला ताब्यात घेतले. यावेळी संतप्त नागरिकांनी चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून चालकाला जमावाच्या तावडीतून सोडविले आणि हडपसर पोलिस ठाण्यात नेले.

नुकसान किरकोळ असल्याने संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेले. चौकशीत चालक हा चौफुला (ता. दौंड) येथील केडगाव परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी चालक आणि टेम्पो पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिला. अल्पवयीनाकडे वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी वाहनमालकाविरुद्ध कारवाई करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news