Pune Liquor Case: पुणे विषारी दारू घोटाळ्यात 18 जणांचा मृत्यू; पोस्टमार्टममध्ये धक्कादायक खुलासे, वरिष्ठ निरीक्षकासह 6 जण निलंबित

Pune Liquor Case Toxic Alcohol Deaths CID Probe: पुणे विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा 18 वर पोहोचला असून काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक झाली असून CID तपास करत आहे.
Pune Liquor Case
Pune Liquor CasePudhari
Published on
Updated on

Pune Liquor Case Toxic Alcohol Deaths CID Probe: पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा आता 18 वर पोहोचला आहे. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असताना, पोस्टमार्टम अहवालातून समोर आलेल्या माहितीने प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. मृतांच्या शरीरात मिथेनॉल आणि देशी दारूचे अंश आढळल्याची पुष्टी झाली असून, स्वस्त दारूच्या नावाखाली विष विकलं जात होतं का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, अनेक जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. काही रुग्णांची दृष्टी कमी झाल्याचे, तर काहींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आता सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आला आहे.

73 वर्षीय ‘सरदारजी’ मास्टरमाइंड?

पोलीस तपासात या संपूर्ण अवैध दारू रॅकेटचा सूत्रधार 73 वर्षीय गुरमंगत सिंह विरका उर्फ ‘सरदारजी’ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अधिक नफा कमावण्यासाठी दारूमध्ये मिथेनॉल मिसळून तिचं प्रमाण वाढवलं जात होतं, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गुरमंगत सिंह विरका, योगेश वानखेडे, राधेश्याम प्रजापती, कल्पेश अग्रवाल, आकाश जाधव, इरफान कुरेशी आणि आर्यन धोत्रे यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयाने 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उरळी कांचनमध्ये तयार होत होती विषारी दारू

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पुण्यातील हवेली तालुक्यातील उरळी कांचन परिसरात अवैधरित्या दारू तयार केली जात होती. आरोपी राधेश्याम प्रजापती हा दारू तयार करत होता, तर योगेश वानखेडे ती पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अड्ड्यांपर्यंत पोहोचवत होता.

माहितीनुसार, 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी करून 2700 रुपयांना विकला जात होता. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी दारूमध्ये ऑनलाइन मागवलेलं मिथेनॉल मिसळलं गेलं, आणि इथूनच मृत्यूचा खेळ सुरू झाला.

फुगेवाडीपर्यंत पोहोचली विषारी दारू

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हीच विषारी दारू पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर विकली जात होती. येथे करनैल सिंह विरका आणि त्याच्या कुटुंबीयांकडून विक्री केली जात असल्याचा संशय आहे. याशिवाय खडकी, वडारवाडी, हडपसर आणि काळेपडळ भागातही या नेटवर्कद्वारे पुरवठा केला जात होता.

Pune Liquor Case
LPG New Rules: 1 जूनपासून LPG चे नियम बदलणार; तुमचं गॅस कनेक्शन होऊ शकतं बंद? सिलेंडर बुकिंग पण थांबणार?

पोलिसांवरही कारवाई

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुरुवातीला मृत्यूंची कारणे नैसर्गिक असल्याचे सांगितल्याने संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून 8 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, काहींना निलंबित तर काहींची बदली करण्यात आली आहे.

दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर काही अधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

Pune Liquor Case
Manoj Jarange Patil: मी उन्हात बसलो, तर तुम्हाला चटके बसतील; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा, एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक

दोन FIR, तपास अधिक गतीने

या प्रकरणात हडपसर आणि दापोडी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, मिथेनॉल सप्लाय चेन आणि अवैध दारू नेटवर्कची खोलवर चौकशी सुरू आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांचा दावा आहे की मृतांचा वास्तविक आकडा अधिक असू शकतो. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news