पुणे : ‘त्या’ शस्त्रक्रियेत पुरुष अजूनही मागेच; शहरात 6 हजार कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

पुणे : ‘त्या’ शस्त्रक्रियेत पुरुष अजूनही मागेच; शहरात 6 हजार कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नपुंसकत्व येईल, पौरुषत्वावर परिणाम होईल, अशा भीतीने अजूनही पुरुषांकडून कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे टाळले जात आहे. शहरात वर्षभरात 6 हजार 288 कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाल्या. त्यामध्ये महिलांच्या 6 हजार 82 या तर पुरुषांच्या केवळ 206 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. कुटुंबनियोजन ही महिलांचीच जबाबदारी आहे, अशा पुरुषी अविर्भावामुळे आजही महिलांनाच शस्त्रक्रिया करण्यासाठी भाग पाडले जात आहे. नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ—ामक समजुतीवर असलेला विश्वास तसेच अनेक रुढी-परंपरा सुशिक्षित समाजात आजही पाळल्या जात असल्याने कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांवरच टाकण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरात शहरात 6 हजार 288 कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया किती झाल्या आहेत. मात्र, यामध्ये महिलांचे प्रमाण 97 टक्के, तर पुरुषांचे प्रमाण केवळ सव्वातीन टक्के आहे. गेल्या वर्षी 2021-22 मध्ये एकूण नसबंदीच्या 6 हजार 511 शस्त्रक्रिया झाल्या असून, त्यापैकी 99 शस्त्रक्रिया पुरुषांच्या आहेत. सुशिक्षित व पुढारलेल्या शहरातील परिस्थिती धक्कादायक असून, नसबंदी शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.

कुटुंबनियोजनासाठी शासनातर्फे दरवर्षी मोहीम राबवण्यात येते. यासाठी उद्दिष्टही ठरवले जाते. यासाठी शासनातर्फे शस्त्रक्रिया करणार्‍यांना अनुदानही दिले जाते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील तसेच दारिद्य्र रेषेखालील महिलांना शासनातर्फे 600 रुपये, तर इतर महिलांना 250 रुपये शस्त्रक्रियेसाठी अनुदान दिले जाते. तर पुरुषांना 1 हजार 100 रुपये नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी मिळतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news