Ayush Komkar Murder Case Update: आयुषच्या खुनापूर्वी आरोपींची वानवडीत बैठक

आंदेकर-गायकवाड टोळी युद्धातून घडलेल्या आयुष गणेश कोमकरच्या खून प्रकरणात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर (वय 36) कृष्णा आंदेकरला पिस्तूल पुरविणारा मुनाफ रिजाय पठाण (वय 28, रा. नाना पेठ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Ayush Komkar Murder Case Update
आयुषच्या खुनापूर्वी आरोपींची वानवडीत बैठकpudhari
Published on
Updated on

पुणे: आयुष कोमकर याच्या खुनापूर्वी सर्व आरोपी हे वानवडी परिसरात एकत्रित जमले होते. तेथे त्यांची बैठक झाली. एकमेकांना भेटताना आरोपी त्यांचा मोबाईल घरी ठेवत होते. त्यांनी, गोळीबाराचा सराव कुठे केला आहे, याचा तपास करायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व मकोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात दिली.

आंदेकर-गायकवाड टोळी युद्धातून घडलेल्या आयुष गणेश कोमकरच्या खून प्रकरणात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर (वय 36) कृष्णा आंदेकरला पिस्तूल पुरविणारा मुनाफ रिजाय पठाण (वय 28, रा. नाना पेठ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Pune News)

Ayush Komkar Murder Case Update
Illegal Hordings: भरपावसात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; औंध, धनकवडी परिसरात कारवाई

आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय 70), तुषार नीलंजय वाडेकर (वय 27), स्वराज नीलंजय वाडेकर (वय 23), अमन युसूफ पठाण (वय 25, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगु (वय 20), यश सिद्धेश्वर पाटील (वय 19), अमित प्रकाश पाटोळे (वय 19), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय 31), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय 21), शिवराज उदयकांत आंदेकर (वय 29), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर(वय 36), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय 60, सर्व रा. नानापेठ) आणि वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय 40) यांच्यासह मुनाफ आणि सोनाली आंदेकर यांना गुरुवारी (दि. 18) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या गुन्ह्यात आयुष याची आई कल्याणी यांनी पुरवणी जबाब दिला. आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जबाबात नाव आले म्हणून केलेली अटक बेकायदेशीर आहे. आगामी महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्यांना लक्ष करत पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. पोलिस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी पूर्वीचीच कारणे दिलेली आहेत.

तांत्रिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने, ॲड. प्रशांत पवार, ॲड. प्रतीक पवार आणि ॲड. अमित थोरात यांनी केला.

महिला आरोपींना न्यायालयीन तर इतरांना पोलिस कोठडी

कोणी निरापराध असेल तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे ही तपास अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. या गुन्ह्यातील पुरुष आरोपींवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा तपास मोठा आहे. त्यामुळे सखोल तपास आवश्यक आहे. मकोकानुसार कारवाई झाल्याने पोलिस कोठडीचे दिवस देखील वाढले आहेत, असे नमूद करत न्यायालयाने रुंदावणी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर इतर आरोपींची 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Ayush Komkar Murder Case Update
JM Road Parking: जे.एम. रस्त्यावरील बंद पडलेले पार्किंग पुन्हा होणार सुरू; महापालिका प्रशासनाकडून हालचालींना वेग

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई

आगामी महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या कुटुंबातून कोण-कोण उभे राहणार आहे? याची माहिती मला विचारली. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, आणि शिवम आंदेकर उभे राहणार असल्याचे मी पोलिसांना सांगितले. त्यानुसार फिर्यादी हिचा पुरवणी जबाब घेऊन सोनाली आंदेकर हिला अटक करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे, असे बंडू आंदेकर यांनी न्यायालयास सांगितले. तू तपासाची वाट लावली आहे. आता तुझी कशी वाट लावतो बग? अशी धमकी मला पोलिसांनी दिल्याचा दावा न्यायालयात केला. मला रात्री दोन वाजेपर्यंत एका पोलिस ठाण्यातील तुरुंगात बसवून ठेवले. माझ्याकडे खुनाच्या अनुषंगाने तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news