

पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट यूजी 2025 अंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएस्सी नर्सिंगच्या अखिल भारतीय कोटा (15 टक्के), अभिमत विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ, सर्व एम्स संस्थांसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन काउन्सिलिंगच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. रविवारी पर्याय नोंदणी पूर्ण झाली असून नवीन वेळापत्रकाप्रमाणे निवड यादी उद्या बुधवारी (दि.17 सप्टेंबर) जाहीर करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
पर्याय निश्चितीसाठी सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मुदत आहे. जागा वाटप प्रक्रिया 15 ते 16 सप्टेंबरदरम्यान पार पडेल. जागा वाटप निकाल 17 रोजी जाहीर होईल. निवड झालेल्या उमेदवारांना 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान संस्थेत हजेरी लावून प्रवेश घ्यावा लागेल, तर महाविद्यालयांना 26 ते 27 रोजी रिपोर्टिंग पूर्ण करावे लागेल. राज्य कोट्याच्या फेरीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही ते लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट वीले आहे.