पुणे : सतराशे मुलांना देणार गोवरची लस

पुणे : सतराशे मुलांना देणार गोवरची लस
Published on: 
Updated on: 

पुणे : पुणे शहरात गोवरचा शिरकाव झाला आहे. भवानी पेठमधील लोहियानगर, कासेवाडी येथील मुलांना गोवर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागातील सर्वेक्षण करून 1 हजार 751 मुलांचा शोध घेऊन त्यांना गोवर प्रतिबंधक लसीचा डोस दिला जाणार आहे. त्यापैकी 529 जणांना लसीचा डोस दिला आहे.

महापालिकेला लोहियानगर आणि कासेवाडीतील बालकाला गोवरची लागण झाल्याचे आढळून आले. चार वर्षांच्या मुलाने गोवरची एकही लस घेतलेली नव्हती, तर दहा वर्षांच्या मुलाबद्दल पालक संभ्रमात होते. या परिसरातील एक ते पाच वयोगटातील मुलांचा शोध घेतला. या भागात एक ते पाच वयोगटातील सुमारे 1 हजार 751 बालके आहेत, त्यांनी यापूर्वी लस घेतली असो किंवा नसो, तरीही महापालिकेने या सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे.

आत्तापर्यंत 529 बालकांना लस देण्यात आली आहे. उर्वरित बालकांचे लसीकरण पुढील पाच दिवसांत पूर्ण केले जाईल. तसेच त्या दोन लहान मुलांना उपचारांनंतर घरी सोडून देण्यात आले आहे, असे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news