पिंपरी : अडीच हजारांपेक्षा अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण

पिंपरी : अडीच हजारांपेक्षा अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये गोवरचे बाधित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आत्तापर्यंत 2 हजार 538 बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. तर, 20 हजार 562 बालकांना 'व्हिटॅमिन ए'ची मात्रा देण्यात आली आहे.
शहरामध्ये कुदळवाडी भागात गोवरचे बाधित रुग्ण आढळले होते.

8 संशयित रुग्णांपैकी 5 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिका वैद्यकीय विभागाकडून गोवर लसीकरण आणि पाच वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत 5 वर्षांखालील 36 हजार 435 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून आजअखेर गोवरचे एकूण 339 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी गेल्या 11 महिन्यांत 8 जणांना गोवरची लागण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news