

पुणे: एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी अद्याप नोंदणी न करणार्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना यासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर 11 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
सीईटी सेलने यासाठी 23 जुलैपासून नोंदणी सुरू केली व 1 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास मुदत दिली. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नसल्याचे निदर्शनास आले तसेच सीईटी सेलकडे मुदतवाढीसाठी विनंती अर्ज करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थिहित लक्षात घेता संबंधित अभ्यासक्रमांना मुदतवाढ देण्यात आली आहे. (Latest Pune News)
त्यामुळे एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता 4 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे, तर 5 ऑगस्टपर्यंत नोंदणी शुल्क भरणा करता येणार आहे. त्यामुळे या मिळालेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सीईटी सेलद्वारे करण्यात आले आहे.