Pune Crime News : कारागृहातून सुटताच मटका अड्डा सुरू

या कारवाईत नाईक याच्यासह साथीदार, तसेच अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले
Pune Crime News
Pune Crime News | कारागृहातून सुटताच मटका अड्डा सुरू File Photo
Published on
Updated on

पुणे : खडक पोलिसांनी मटका अड्ड्यावर कारवाई करून नंदू ऊर्फ नंदकुमार नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जुगार, मटका अड्डा चालविण्याचे नाईकवर 60 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सांगतात. नुकतेच त्याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. गृहविभागाने आठ दिवसांत ही कारवाई रद्द केल्यानंतर नागपूर कारागृहातून बाहेर पडलेला नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी नंदू नाईक (वय 70, रा. शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ), विजय रंगराव शिंदे (वय 69, रा. शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता), शंकर सायअण्णा मॅडम (वय 65, रा. महात्मा फुले पेठ) यांच्यासह एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस नाईक आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

Pune Crime News
Pune Crime: पूर्वीच्या वादातून फिरस्ती मित्राचा खून; समर्थ पोलिसांकडून आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू नाईक याच्याविरुद्ध मटका, तसेच जुगार अड्डा चालविण्याचे 63 गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारी वर्तुळात तो ’मटका किंग’ नावाने ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली होती. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. महापालिकेने त्याच्या छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूर केला होता.

त्यानंतर 17 मार्च रोजी नाईक याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. नाईक याने ही कारवाई रद्द करण्यासाठी वकिलांमार्फत गृहविभागात प्रयत्न केले. गृहविभागाने ही कारवाई नुकतीच रद्द केली. नाईक कारागृहातून बाहेर पडला आणि त्याने छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीत पुन्हा मटका अड्डा सुरू केला. याबाबतची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत नाईक याच्यासह साथीदार, तसेच अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाइल, मटका खेळण्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. पोलिस हवालदार घोलप तपास करत आहेत.

Pune Crime News
Pune Crime: मोलकरणीने चोरले 26 लाखांचे दागिने; एका नखावरून झाला चोरीचा उलघडा

मोबाईल अ‍ॅपद्वारे क्रिकेट बेटिंग

मोबाईल अ‍ॅपद्वारे क्रिकेट बेटिंगवर जुगार घेणार्‍यांच्या विरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बकशलाल ऊर्फ बाबा मोहंमद हुसैन हनुरे (वय 32, कोणार्क पूरम सोसायटी, कोंढवा), इल्लू (पूर्ण नाव पत्ता नाही) या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार सदाशिव सरडे यांनी फिर्याद दिली आहे. लष्कर पोलिसांना जनरल भगत मार्ग कॅम्प परिसरात आरोपी क्रिक्रेट बेटिंगवर अ‍ॅपद्वारे हार- जीतचा खेळ घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी मोबाईल फोनचा वापर करून एका अ‍ॅपद्वारे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेबसाईट लिंक, आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून क्रिकेट बेटिंग सट्टा स्वीकारून जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news