कोरेगाव भीमा : कंपनीतून साहित्य चोरीला

कोरेगाव भीमा : कंपनीतून साहित्य चोरीला

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ऑटो कोटर्स कंपनीतून हजारो रुपयांचे साहित्य चोरीला गेले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सणसवाडी येथील अंकिता ऑटो कोटर्स कंपनीत वाहनांच्या पार्टला पेंटिंग करण्याचे काम केले जाते.

या कंपनीत असलेले सर्व साहित्य एका गोडाऊनमध्ये ठेवून एचआर मॅनेजर दीपक अशोक शिरसठ घरी गेले होते. सकाळच्या सुमारास काही कामगार कंपनीत आले असताना त्यांना गोडाऊनचे कुलूप तुटलेले दिसून आल्याने त्यांनी शिरसठ यांना माहिती दिली. त्यांनी कामगारांच्या मदतीने गोडाऊनमध्ये पाहणी केली असता, कंपनीतील तब्बल 70 हजार रुपयांचे रंग व अन्य साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news