डांगे चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल गळती; बाइकस्वारांचे घसरून अपघात

डांगे चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल गळती; बाइकस्वारांचे घसरून अपघात
Published on
Updated on

वाकड : पदमजी पेपर मिल शेजारील पेट्रोल पंपासमोर अत्यंत मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाली असून येणाऱ्या जाणाऱ्या बऱ्याच बाइकस्वारांचे घसरून इथे अपघात होत आहेत. मदतीसाठी सर्वांनी त्वरित यावे असे आवाहन थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. पदमजी पेपर मिल ते डांगे चौक रस्त्यावर आज सकाळी ऑइल गळती झाल्याचे निदर्शनास आले असून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच सोशल फाउंडेशनच्या टीमला ही बाब कळवली.

सकाळची वेळ असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती परंतु रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे बऱ्याच टू व्हीलर घसरून अपघात होत होते आणि या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ अग्निशामन दलाला याबाबत माहिती दिली असून एक बंब ऑइल धुवून काढण्यासाठी घटनास्थळी येत आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वाहन चालकांना सावकाश गाडी चालवण्याची विनंती करीत होते. दरम्यान ही ऑइल गळती कशामुळे झाली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news