पुणे : शासकीय कार्यालयात मार्च एंडचा ‘फिव्हर’

पुणे : शासकीय कार्यालयात मार्च एंडचा ‘फिव्हर’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सरकारी कार्यालये, बँकिंग विश्व आणि वित्तीय संस्थांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू होती. जिल्हा प्रशासन पातळीवरही विविध विभागांकडून उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वसुलीची लगबग सुरू होती. बँका आणि पतसंस्थांनी वसुलीसाठी यंत्रणा उपलब्ध केल्या. सहकारी बँकांची वाहने वसुलीसाठी फिरत होती. सहकारी व खासगी बँका, वित्तीय संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय फी आणि परवाना फी यासाठी यंत्रणा गतिमान झाली होती.

सुटीच्या कालावधीतही बिलाचा भरणा करून घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे सुरू असल्याचे दिसून आले. बँका आणि पतसंस्थेने थकीत कर्जासाठी वसुलीप्रक्रिया गतिमान केली होती. बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये वार्षिक ताळेबंदाची मांडणी वेगाने सुरू होता. सरकारी कार्यालयात अन्य विभागांची देणी भागविताना वर्षभरातील जमा-खर्चाचा हिशेब मांडण्यात आला. सगळीकडे मार्च एंडिंगचा फिव्हर निर्माण झालेला दिसून आला.

निधी खर्चाची लगबग
शासनाने मंजूर केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी ठेकेदारांचीदेखील जिल्हा परिषद आणि सरकारी कार्यालयात एकच गर्दी पहायला मिळाली. याच बरोबर विविध कामांसाठी आमदार खासदारांची पत्रेदेखील जिल्हा नियोजनकडे सादर होत होते. त्यामुळे असलेला निधीचा संपूर्ण खर्च करण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची लगबग सुरू असल्याचे पहायला मिळाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news