

तळेगाव स्टेशन : मावळ परिसरास निसर्ग सौंदर्याची देणगी लाभली असून लोणावळा,खंडाळा,कार्ला,पवनानगर येथे राज्याच्या कानाकोप-यातुन अनेक पर्यटक येत असुन तेथे तुफान गर्दी होत असलेमुळे, वाहतूक कोंडी होत असुन प्रशासनाकडून अनेक निर्बंध लावलेमुळे आणि इतर भरपूर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पर्यटक वडेश्वर,खांडीसावळा येथेही आकर्षित होत असून धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत आहेत.
तसेच श्री घोरावाडीश्वर डोंगर, परिसर,श्री चौराई माता डोंगर परिसर,श्री हरणेश्वर टेकडी,श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसर, तळेगाव,उर्से, कुंडमळा आदी निसर्गरम्य परिसर पर्यटकांना खुणावत आहे.आणि पर्यटकही प्रतिसाद देत आहेत.पर्यटनाचा आनंद घेत असताना जीवीतहानी होवून अनेक अप्रिय घटनाही घडत आहेत तरी पर्यटकांनी प्रशासनाच्या सुचना तंतोतंत पाळणे आवश्यक आहे
.पावसामुळे डोंगरवाटा,तलाव परिसर,नद्या काठचा परिसर निसरडा झाला असणेची शक्यता असुन पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना या बाबीची काळजी घेणे आवश्यक आहे.