Manoj Jarange Patil: आळेफाटा येथे पहाटे मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत

फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, एक मराठा लाख मराठाच्या जयघोषणात त्यांचे येथे भव्य असे स्वागत करण्यात आले.
Manoj Jarange Patil
आळेफाटा येथे पहाटे मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागतPudhari
Published on
Updated on

आळेफाटा: मराठा आरक्षण प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अंतर्वली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे गुरुवार (दि 28) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या समोरास आळेफाटा (ता जुन्नर) येथे आगमन झाले. फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, एक मराठा लाख मराठाच्या जयघोषणात त्यांचे येथे भव्य असे स्वागत करण्यात आले.

गुरूवारी पहाटेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचे पुणे जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आणे, पेमदरा, बेल्हे, राजुरी व ठिकठिकाणी स्वागतानंतर ते आळेफाटा परिसरात आले. आळे, संतवाडी, कोळवाडी, आळेफाटा, वडगाव आनंद येथील सकल मराठा समाज व सर्व समाज बांधव यांचे वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले. (Latest Pune News)

Manoj Jarange Patil
Pune Robbery: चाकूच्या धाकाने रोकड लुटणारा जेरबंद; शोरूममधील स्टोअरकीपरचे कृत्य

एकूण 40 जेसीबीतून त्यांच्यावरती फुलांची उधळण करण्यात आली. आळेफाटा चौकातील एक मराठा लाख मराठा या व इतर घोषणांनी आळेफाटा परिसर पहाटेच्या सुमारास दणाणून गेला होता.

आळेफाटा चौकात थांबल्यानंतर त्यांनी उपस्थित सर्वांना अभिवादन केले आणि चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती पुष्पगुच्छ केली. अगदी रात्रभर येथे सर्व समाज बांधव जागे होते. काल सायंकाळ पासूनच अहिल्यानगर कल्याण महामार्गाने मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने मराठी समाज बांधव वाहनांतून जाऊ लागली आहेत.

Manoj Jarange Patil
MAT Decision: ‘मॅट’चा पुणे पोलिसांना दणका; विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार्‍या महिला अधिकार्‍याची बदली रद्द

लवणवाडी, लवणमळा, बोरीफाटा, आळे स्टॅन्ड, आळे दुध डेअरी, मार्केट यार्ड, आळेफाटा, बाह्यवळण पुल व वडगाव आनंद येथे येणा-या बांधवांना पाणी, बिस्किट, दुध यांची व्यवस्था करण्यात आली होती. आळेफाटा नंतर वडगाव आनंद येथेही मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आळेफाटा पोलिस ठाण्याचे वतीने हद्दीतील सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news