मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि. 21) तरकारीची 11 हजार 641 डाग आवक झाली. शेवग्यास प्रतिदहा किलोला 375 ते 700 रुपये बाजारभाव मिळाला. तरकारीची आवक वाढली, तरीही बाजारभाव स्थिर होते, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली. (Latest Pune News)
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर, शिरूर भागातून मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक होते. शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतमालाचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कम, याचा एसएमएस मोबाईल ॲपद्वारे संबंधितांच्या मोबाईलवर लगेचच पाठविला जातो. या विश्वासामुळेच पाच तालुक्यांतून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी मंचर बाजार समितीत घेऊन येतात, असे सभापती थोरात यांनी सांगितले.
प्रतिदहा किलोला मिळालेला बाजारभाव रुपयांत पुढीलप्रमाणे : कंसात मालाची आवक - वाटाणा (48) 575-1000, कारले (167) 165-310, गवार (85) 635-1170, घेवडा (53) 200-450, चवळी (217) 250-460, ढोबळी मिरची (10) 100-500, भेंडी (258) 210-400, फरशी (226) 100-400, फ्लॉवर (3364) 85-160, भुईमूग शेंगा (1) 350, दोडका (33) 185-350, मिरची (317) 230-450, तोंडली (8) 150-451, लिंबू (4) 400, काकडी (649) 80-150, कोबी (1340) 70-120, वांगी (85) 285-550, दुधी भोपळा (98) 130-251, बीट (2957) 100-200, आले (30) 150-550,
टोमॅटो (105) 190-360, मका (780) 40-120, पावटा (7) 300-370, वालवड (164) 430-620, राजमा (106) 100-580, शेवगा (156) 375-700, पापडी (43) 350-620, आंघोरा (7) 80-155, काळा वाल (9) 100-580, डांगर भोपळा (113) 60-120, गाजर (69) 120-200, सीताफळ (72) 155-280, बटाटा (5) 100-150, रताळे (12) 300-400. बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी ही माहिती दिली.