

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी-पुरस्कृत भीमाशंकर सहकारी पॅनेलने बाजी मारली असून, त्यांचे एकूण 17 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून स्वतंत्र पॅनेल उभे करणारे देवदत्त निकम हे विजयी झाले आहेत. शिवसेना-भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे भीमाशंकर शेतकरी विकास पॅनेल व देवदत्त निकम हे स्वत: सोडून त्यांच्या पॅनेलचा सर्व जागांवर पराभव झाला.
माजी गृहमंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भीमाशंकर सहकारी पॅनेलचे 14 उमेदवार निवडून आल्याने वळसे पाटील यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. निकम यांनी बंडखोरी केल्यानंतर स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे पॅनेल होते .एकूण तीन पॅनेलमध्ये लढत झाल्याने निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
महाविकास आघाडी पुरस्कृत भीमाशंकर सहकारी पॅनेलचे विजयी उमेदवार व पडलेली मते पुढीलप्रमाणे – सोसायटी प्रतिनिधी सर्वसाधारण गट 7/इ जागा विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे महाविकास आघाडी -संदीप दत्तात्रय थोरात 365, गणेश सूर्यकांत वायाळ 350, शिवाजीराव बाबुराव ढोबळे 396, वसंतराव भागूजी भालेराव 364, सचिन हरिभाऊ पानसरे 413, रामचंद्र देवराम गावडे 381, राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर देवदत्त जयवंतराव निकम 379 , अरुण ठकाजी हगवणे 330 पराभूत. सोसायटी प्रतिनिधी महिला राखीव जागा 2, महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रत्ना विकास गाडे 372 , मयुरी नामदेव भोर 375, पराभूत उमेदवार ज्योती सागर काळे 120 , सुषमा अरुण गिरे 294, नंदा दत्तात्रय विश्वासराव 124, कृषी पतसंस्था बहुउद्देशीय सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग जागा 1 : विजयी उमेदवार जयसिंग कुंडलिक थोरात 389, पराभूत उमेदवार सुनील कोंडाजी इंदोरे 116, श्रीकांत दामोदर चासकर 143 मते. कृषी पतसंस्था बहुउद्देशीय सहकारी संस्था अनुसूचित जमाती जागा 1 विजयी उमेदवार : सखाराम धोंडू गभाले 437 ,पराभूत रामदास तुकाराम भोकटे 223.
ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण एकूण जागा 2 : विजयी उमेदवार सोमनाथ वसंतराव काळे 441, नीलेश विलास थोरात 473, पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे : सुनील कोंडाजी इंदोरे 116, ताराचंद देवराम कराळे 333, नीलम किशोर गावडे 96, विठ्ठल सीताराम ढोबळे 0 मते. ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती एकूण जागा 1 विजयी उमेदवार : संदीप भीमाजी चपटे 547, पराभूत उमेदवार प्रकाश राघू लोहकरे 192 मते, सोमनाथ सुदाम गेगजे 36 मते. ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिक दुर्बल जागा 1 विजयी उमेदवार अरुण शांताराम बांगर 563 मते, पराभूत उमेदवार उत्तम गेणभाऊ थोरात 220 मते. व्यापारी आडत गटात : लक्ष्मण बानखेले, राजेंद्र भंडारी या 2 जागा, हमाल व तोलारीमधून सुनील खानदेशे 1 या तीन जागा महाविकास आघाडीने बिनविरोध जिंकल्या आहेत.