Crime News : पोलिस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली

Crime News : पोलिस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लष्कर भागातील मॉडर्न डेअरीला सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली होती. त्या वेळी अग्निशमन दलाच्या वाहनांना वाट करून देण्यासाठी पोलिस कर्मचारी लोकांना मागे सरकवण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, एकाने पोलिस कर्मचार्‍याला धक्काबुक्की करून कानशिलात लगावली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत पोलिस शिपाई लोकेश दिलीप कदम (वय 35) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभान अब्दुलकादर सौदागर (वय 38, रा. भीमपुरा गल्ली नं. 9, कॅम्प) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 22) रात्री मॉडर्न डेअरीजवळ असलेल्या रेडिओ हॉटेलसमोर घडला.

फिर्यादी कदम व त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक बनसुडे, पोलिस शिपाई सागर हराळ व पोलिस नाईक मांजरे हे गर्दी कमी हटवून अग्निशमन दलाच्या जवानांना व वाहनाला वाट करून देत होते. आरोपीने 'तुम्ही मला सांगणारे कोण?' असे म्हणत वाद घातला. त्या वेळी कदम यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने कदम यांना धक्काबुक्की केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news