Pune News: बनावट कागदपत्रांद्वारे 561 कोटींची कर चुकवेगिरी; एकास अटक

जीएसटी पुणे कार्यालयाकडून हैदराबादमधील एकास अटक
Pune Crime
बनावट कागदपत्रांद्वारे 561 कोटींची कर चुकवेगिरी; एकास अटकFile Photo
Published on
Updated on

Latest Pune News: बनावट कंपनीच्या नावे कागदपत्रे सादर करून 561 कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकविल्याप्रकरणी मोहम्मद रियाजउद्दीन (रा. हैदराबाद, तेलंगण) यास अटक करण्यात आली आहे. तर, त्याच्या अन्य सात साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पुणे (Pune) कार्यालयाने ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

Pune Crime
Stamp Duty News: पुण्याने दिले 5,253 कोटींचे मुद्रांक शुल्क

या प्रकरणात रियाजउद्दीनसह त्याचे साथीदार अब्दुल सलाम, नैशाब मलिक, सलमान मलिक, शादाब, तन्वीर, ओएसिस, राजू यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी दिली. याबाबत जीएसटी पुणे कार्यालयातील अधिकारी रवी भूषणप्रसादसिंग कुमार (वय 34) यांनी बंडगार्डन पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जीएसटी (GST) कार्यालयातील अधिकार्‍यांनी ऑगस्ट महिन्यात एन. एल. ट्रेडर्स या खात्याची ऑनलाइन तपासणी केली. तेव्हा काही व्यवहार संशयास्पद आढळून आले. त्यानंतर जीएसटी कार्यालयातील पथकाने चौकशी सुरू केली. नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात एका भंगार साहित्य खरेदी-विक्री करणार्‍या व्यावसायिकाकडे चौकशी केली.

Pune Crime
'सीसीटीएनएस' प्रणाली लवकरच राज्यभर लागू होणार

त्यांच्याकडे जीएसटी करभरणा पावत्यांबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा हैदराबाद (Hyderabad) येथील एस. बी. ट्रेडिंग कंपनीचे सलीमभाई यांनी पावत्या दिल्याची माहिती त्याने दिली. करपावत्यांबाबत संशय आल्याने याबाबतची माहिती हैदराबाद येथील जीएसटी कार्यालयाला कळविण्यात आली.

हैदराबाद येथील पथकाने चौकशी केली तेव्हा अशा प्रकारची कंपनी तेथे अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. तांत्रिक तपासणीत मोहम्मद रियाजउद्दीनने जीएसटी करपावती तयार केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संपतराव राऊत तपास करत आहेत.

58 कंपन्यांसाठी करभरणा पावत्या केल्या तयार

चौकशीदरम्यान रियाजउद्दीनने 58 कंपन्यांसाठी करभरणा पावत्या तयार केल्याची कबुली दिली. करचुकवेगिरी तसेच कर भरण्याबाबतच्या बनावट पावत्या तयार करण्यासाठी अन्य आरोपींनी पैसे दिल्याची माहिती रिजाजउद्दीनने जीएसटी पथकाला दिली. आरोपींपैकी राजू यादवकडे बनावट पावत्यांद्वारे कर भरल्याचे भासवून फसवणूक करण्याचे काम सोपविण्यात आले होते. 2021 पासून आरोपींनी बनावट करभरणा पावत्या तयार करून 561 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news