Stamp Duty News: पुण्याने दिले 5,253 कोटींचे मुद्रांक शुल्क

जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत 1.38 लाख मालमत्तांची नोंदणी
Stamp Duty News
पुण्याने दिले 5,253 कोटींचे मुद्रांक शुल्कPudhari
Published on
Updated on

Pune News: जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत पुण्यात 1 लाख 38 हजार 412 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. त्यातून सरकारी तिजोरीत तब्बल 5 हजार 253 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कापोटी जमा झाले आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड या शहरी भागांबरोबरच मावळ, मुळशी आणि वेल्ह्यातील मालमत्ता नोंदणी वाढली आहे.

पुण्यातील (Pune) रिअल इस्टेट बाजारपेठ वेगाने वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता नोंदणी 29 टक्क्यांनी वाढली असून, महसुलात 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागरिकांच्या उत्पन्नात झालेली वाढ, पतपुरवठ्याच्या विविध संधी, गुंतवणुकीकडे वाढलेला कल, यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढत असल्याचे नाईट फ्रॅंक इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. (Latest Pune News)

सप्टेंबर महिन्यात शहरात 11 हजार 56 मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. तर, मुद्रांक शुल्काची रक्कमही 13 टक्क्यांनी घटून 508 कोटी रुपयांवर आली आहे. सप्टेंबर महिन्यात श्राद्ध पंधरवडा असल्याने या कालावधीतील नोंदणी घटली.

परिणामी, महिन्याच्या एकूण नोंदणी आणि महसुलावरही विपरित परिणाम झाला आहे. यंदाही 800 चौरस फुटांवरील प्रशस्त घरांच्या मागणीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हा टक्का 28 होता.

पुणे आणि हवेली तालुक्यातील सदनिकांना चांगली मागणी आहे. याशिवाय, पिंपरी-चिंचवडमधील प्रकल्पांना खरेदीदारांकडून पसंती मिळत आहे. एकूण व्यवहारांपैकी 80 टक्के सदनिका याच भागातील आहेत. मावळ, मुळशी आणि वेल्हे तालुक्यांत 12 टक्के मालमत्ता नोंदणी झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news