पुणे: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on
Updated on

ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: नगर-कल्याण महामार्गावरील कोळवाडी गावच्या हद्दीत ओतूरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची माहिती ओतूर पोलीस सूत्रांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोळवाडी गावच्या हद्दीतील वाटखळे येथे कायम रहिवासी असलेला राहुल बाजीराव घोलप (वय ३५) हा होंडा शाईन (एमएच १४ केएच १३१०) या दुचाकीवरून ओतूरच्या दिशेने येत असताना त्याच्या दुचाकीस एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात राहुल हा जागीच गतप्राण झाला. हा अपघात सोमवारी (दि. १) रात्री १०.१५ दरम्यान घडला. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद मयताचा भाऊ विनोद बाजीराव घोलप यांनी ओतूर पोलिसात दिली. पुढील तपास सहाययक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुरेश गेंगजे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news