चार्जिंग स्टेशन्सची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ती 1,900 असून, त्यापाठोपाठ मुंबईतही 415 चार्जिंग स्टेशन्स आहेत. त्यानंतर ठाणे, नागपूर, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांतदेखील चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक ही सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. सन 2025 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर 25 टक्क्यांपर्यंत कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या वाहनांंना घरच्या घरी चार्जिंग करण्याची सुविधा आहे; मात्र दूर प्रवासात असताना बॅटरीचे चार्जिंग संपल्यास चार्जिंग करण्यासाठी महावितरण वीज कंपनीने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास पुढाकार घेतला.