

पुणे : राज्यात मुसळधार पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, बुधवार (दि. 24 सप्टेंबर) पर्यंत मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्याच्या सर्वच भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळी वारे यासह पाऊस होणार आहे. तर कोकणात काही ठिकाणीच पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राजस्थानच्या पश्चिम भागापासून गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. सध्या परतीचा मान्सून पंजाब, हरियाणा तसेच गुजरातच्या काही भागातून परतीच्या प्रवासावर आहे. पुढील पाच ते दहा दिवसांत राज्यातून परतीचा प्रवास करणार आहे. दरम्यान, सध्या उत्तर- दक्षिण महाराष्ट्रापासून द्रोणीय रेषा पश्चिम- मध्य आणि दक्षिण- पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत (मराठवाडा, तेलंगण आणि रॉयलसीमा मार्गे) जात आहे.
तसेच, मराठवाड्यात असलेली चक्रीय स्थिती कायम आहे. एक द्रोणीय रेषा उत्तर प्रदेशाच्या मध्य भागापासून मराठवाड्यापर्यंत कार्यरत आहे. त्यामुळे मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे. कोकणात 19 सप्टेंबरपर्यंत काही भागात जोरदार पाऊस राहील, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे (22), नाशिक (19), अहिल्यानगर (19 व 25), सातारा (25), सातारा घाटमाथा (25), सोलापूर (19 ते 25), छत्रपती संभाजीनगर (19 आणि 25), जालना (19), परभणी (19), बीड (19, 20 आणि 25), नांदेड (22), लातूर (19 ते 25), धाराशिव (19 ते 25), अमरावती (19), नागपूर (19), वर्धा (19).