Maharashtra RTE admission 2026: ८,४९१ शाळांची नोंदणी, १.११ लाख जागा उपलब्ध

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू; कागदपत्रांची कडक तपासणी होणार
RTE admission 2026
RTEPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये 9 ते 30 जानेवारीदरम्यान शाळा नोंदणी तसेच व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार 8 हजार 491 शाळांची नोंदणी झाली असून प्रवेशासाठी यंदा 1 लाख 11 हजार 423 जागा उपलब्ध झाल्या आहेत. येत्या आठवड्यात आता प्रवेशासाठीची विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

RTE admission 2026
Pune University Toon Camp: पुणे विद्यापीठात आठवडाभराचा ‘टून कॅम्प’

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांवर ऑनलाइन पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने 9 जानेवारीपासून विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू करण्यात आली आहे.

RTE admission 2026
Maharashtra Sahitya Parishad Election Controversy: महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले

त्यासाठी मुदतवाढ देऊन 30 जानेवारीपर्यंत संबंधित प्रक्रिया राबविण्यात आली. आता प्रक्रियेसाठी चार ते पाच दिवस देण्यात येणार असून, त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा विद्यार्थ्यांच्या पालकांची कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात येणार आहे.

RTE admission 2026
Pune District Rabi Crop Loan: रब्बी हंगामात पुणे जिल्हा बँकेकडून ४७६ कोटींचे पीक कर्जवाटप

यामध्ये भाडेकरारनामा आणि आयकर उत्पन्न प्रमाणपत्र तसेच जातीचे प्रमाणपत्र यांची कसून तपासणी केली जाणार आहे. फेबुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात येऊन विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचेदेखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

RTE admission 2026
Pune Family Court Interim Maintenance: उत्पन्न लपविल्याबद्दल पतीला दणका; पत्नीला १० हजार अंतरिम पोटगी

पुण्यात 907 शाळांची नोंदणी...

पुण्यात आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात शाळांची नोंदणी करण्यात येते. त्यानुसार यंदाही 907 शाळांची नोंदणी करण्यात आली आहे, तर प्रवेशासाठी 17 हजार 890 जागा उपलब्ध झाल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news