

पुणे : राज्याच्या सर्वच भागांत पुन्हा सुरू झालेल्या पावसाचा जोर दसऱ्यापर्यंत कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.राज्याच्या सर्वच भागांत शुक्रवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. या पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की, शनिवारी सकाळपर्यत पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दसऱ्यापर्यंत पडण्याची शक्यता आहे..(Latest Pune News)
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीवता वाढणार असून, ते शनिवारी दक्षिण ओरिसा ते उत्तर आंध किनारपट्टी पार करीत पश्चिमेकडे प्रवास करणार आहे. दक्षिण ओडिसा ते गोवा, उत्तर कर्नाटकपर्यंत द्रोणीय स्थिती तसेच तीव कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. याशिवाय अंदमान समुद्रावर चक्रीय स्थिती असून, ती 30 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. या बरोबरच बंगालच्या उपसागरात 1 ऑक्टोबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या स्थितीमुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे.
राज्याच्या अनेक भागांत शुक्रवार दुपारपासूनच पावसाने वेग घेतला आहे. पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत पावसाची तीवता अधिक असून, या भागात वाऱ्याचा वेगही जास्त आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ‘मुसळधार ते अतिमुसळधार’