

Maharashtra Monsoon Update
पुणे : राज्यातील वीस जिल्ह्यात बुधवार पर्यंत मोठा पाऊस राहणार आहे. बुधवारी फक्त रायगड आणि पुणे घाटमाथ्याला रेड तर नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार 21 ऑगस्ट पासून मात्र राज्यातून मोठा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गत 24 ते 48 तासांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हाहाकार निर्माण झाला आहे. मध्यमहाराष्ट्रात मात्र मध्यम पाऊस सुरु आहे. हवेचे दाब वाढल्याने राज्यातील मोठा पाऊस 21 ऑगस्ट पासून कमी होत आहे. त्यानंतर मात्र मोठी उघडीप राहणार असल्याचा अंदाज आहे.
रेड अलर्ट : रायगड (20),पुणे घाटमाथा (20)
ऑरेंज अलर्ट : पालघर (20), ठाणे (20), मुंबई (20), रत्नागिरी (20), धुळे (20), नाशिक घाट (20), पुणे घाट (21), कोल्हापूर घाट (20), सातारा घाट (20)
यलो अलर्ट : पालघर (20), ठाणे (20), मुंबई (20), रायगड (21 ते 23), रत्नागिरी (21 ते 23),सिंधुदुर्ग 920), नाशिक (20), नाशिक घाट (21), पुणे घाट (22), कोल्हापूर घाट (22), सातारा घाट (21,22), अकोला,अमरावती,भंडारा बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा (21 ते 23) यवतमाळ (20)
24 तासांत राज्यात झालेला पाऊस (मि.मी.)
कोकण : माथेरान 255, म्हसळा 251, तळा 241, सांताक्रूज 238, सावडे 238, दापोली 230, वैभववाडी 230, रोहा 223, वसई 219, माणगाव 217, लांजा 215, श्रीवर्धन 208, पनवेल 208, पेण 190, राजापूर 180, सुधागड पाली 176, कर्जत 175, मंडणगड 168, ठाणे 166, वाडा 163, पोलादपूर 161, महाड 157, खेड 155,चिपळूण 150, भिवंडी 147, रत्नागिरी 144, संगेमनेर 141, उरण 139, संगमेश्वर देवरुख 134, अंबरनाथ 134, खालापूर 132, देवगड 131, वाकवली 130, गुहागर 122, हर्णे 121, कणकवली 120, पालघर 119, उल्हासनगर 118, केपे 117, रामेश्वर 116, मुरबाड 111,विक्रमगड 110, काणकोण 106
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 261, राधानगरी 221, महाबळेश्वर 173, शाहूवाडी 161, लोणावळा 155, कोल्हापूर,कागल 66, पाटण 62, हातकणंगले 58, गडहिंगलज 57,इगतपुरी 55,शिराळा 53, पन्हाळा 47, चंदगड ,पौड मुळशी 46, मुल्हेर 43,चिंचवड 39, फलटण 38, आजरा 35, तळेगाव 34, भोर, कराड 31, रावेर 30, वेल्हे 29,मिरज, खंडाळा 26
मराठवाडा : अंधार 70, गेवराई 69, माहूर 61,किनवट 54, धारूर 52, हिमायतनगर 46, लोहारा 39, अंबेजोगाई 37, सिल्लोड 36, मंंंजळगाव 34, सोयगाव 27, कळमनुरी 23,धाराशिव 22, उमरगा, उदगीर 21, हडगाव 20
विदर्भ : ब्रह्मपुरी 164, आमोरी 156, देसाईगंज 155, भामरागड 133, गडचिरोली 128, भीवापूर 108, चंद्रपूर ,लखांदरू 107 प्रत्येकी, नागभीड 99, सावली 97, नागपूर एअरपोर्ट 91, कळमेश्वर 84, अजुगनी मोरगाव 83, मूल 82,चार्मोशी 81, साकोली, पवनी 76, कुरखेडा,एटापल्ली 74, धनोरा 73, मुलचेरा 69, चंद्रपूर 57 अमरावती 51
घाटमाथा : ताम्हीणी 320, डुंगरवाडी 271,भिरा 261, दावडी 255, धारावी 235, कोयना(पोफळी) 215, शिरगाव 210, अंबोणे 196, लोणावळा (टाटा) 189, कोयना (नवजा) 151, लोणावळा (ऑफिस) 145, खोपोली 11.5,वळवण 102, भिवपुरी 81, खंद 62, शिरोटा 38, वाणगाव 32, ठाकूरवाडी 22