

Monsoon in Maharashtra
पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात क्षीण झालेला मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. राज्यातील बहुतांश भागांत 13 व 14 रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी (94 टक्के ) पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कमी पाऊस आहे. (Latest Pune News)
त्यामुळे मान्सून कमी प्रमाणात बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याप्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात खूप कमी पाऊस झाला. त्यानंतर 8 ते 12 ऑगस्टपर्यंत पावसाने खंड दिला आहे. मात्र, 13 ऑगस्टपासून मान्सून जोर धरत आहे. कारण, बंगालच्या उपसागरात वार्याची स्थिती चक्रीय झाली असून, वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.