Devram Lande Resignation: कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप प्रकरणाला राजकीय वळण; देवराम लांडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या वादातून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप; चौकशी पूर्ण होईपर्यंत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
Devram Lande
Devram LandePudhari
Published on: 
Updated on: 

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ व व्हिडिओ क्लिप प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

Devram Lande
Shirur Ganja Seizure: शिरूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; २५० किलो गांजा जप्त, किंमत दीड कोटींहून अधिक

या प्रकरणामागे राजकीय विरोधकांचे षडयंत्र असण्याची शक्यता असून, त्याद्वारे आपली वैयक्तिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना त्यांनी राजीनामापत्रात व्यक्त केली आहे.

Devram Lande
Pune Destination Wedding: पुण्याच्या निसर्गरम्य ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड; लोणावळा, मुळशीसह ३० ते ३५ ठिकाणांना पसंती

मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये तसेच पक्षाला कोणतीही राजकीय अडचण निर्माण होऊ नये, या भूमिकेतून चौकशी पूर्ण होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Devram Lande
Pune Court Security: बॉम्बच्या धमक्या अन् गोळीबाराने पुणे जिल्हा न्यायालय हादरले; सुरक्षाव्यवस्था सक्षम करण्याची मागणी

दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्ष कोणत्याही अनुचित प्रकाराचे समर्थन करणार नसून, संबंधित प्रकरणाची पोलिस प्रशासन व संबंधित विभागामार्फत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Devram Lande
Shivajinagar Court Crime: पुणे शिवाजीनगर न्यायालयाचा परिसर गुन्हेगारांच्या टार्गेटवर; ४० वर्षांत खून, गोळीबार अन् टोळीयुद्धाच्या घटना

या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, या उद्देशाने देवराम लांडे यांनी राजीनामा दिल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पोलिसांच्या चौकशीतून नेमकी काय वस्तुस्थिती समोर येते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.