Maharashtra Olympic Association | महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन : महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या निलंबनाची मागणी

Pune News | संदीप भोंडवे यांची पत्रकार परिषदेत माहिती
Maharashtra Olympic Association
संदीप भोंडवे पत्रकार परिषदेत माहिती देताना (Pudhari Photo)
Published on
Updated on

Protest on Maharashtra Olympic Association

पुणे : ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या विविध संघटनांना पंचवार्षिक निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार बजावण्यापासून दूर ठेवत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी केलेल्या मनमानीविरोधात राज्यातील विविध क्रीडा संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिरगावकरांच्या या बेकायदेशीर कृतीविरोधात मंगळवार (दि. 23) पासून तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

या पत्रकार परिषदेला अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, हँडबॉल संघटनेचे सरचिटणीस राजाराम राऊत, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, तायक्वांदो खेळाडू मिलिंद पाठारे आदी उपस्थित होते.

Maharashtra Olympic Association
Pune Crime: गँगवॉर वाढताच पुणे पोलीस Action Mode वर, नऊ गुंड दोन वर्षांसाठी तडीपार

भोंडवे म्हणाले की, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सरचिटणिस नामदेव शिरगावकर यांनी १५ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच निवडणुकीत मतदानास पात्र २२ क्रीडा संघटनांची यादी जाहीर केली. यामधून कुस्ती, कब्बडी, बॉक्सिंग, स्विमिंग व हॅण्डबॉल या संघटनांना वगळण्यात आले. यापूर्वीच्या निवडणुकीत या पाचही संघटना पात्र होत्या. असोसिएशनशी संलग्नित ४७ ते ४८ संघटना असतानाही केवळ राजकारणासाठी व स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिरगावकर यांनी फक्त २२ संघटनांना मतदानासाठी पात्र ठरवले आहे. त्यांचे हे कारस्थान जाणूनबुजून केलेले असून, यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंचे मोठे नुकसान होणार आहे.

दरम्यान, गोवा, उत्तराखंड आणि गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंसाठी महाराष्ट्र शासनाने दरवर्षी चार कोटी याप्रमाणे तीन वर्षांसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला १२ कोटींचा निधी दिला आहे. मात्र, असोसिएशनकडून या निधीच्या विनियोगाचा तपशील सादर केला नाही. यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप ही भोंडवे यांनी यावेळी केला. मागण्या मान्य होण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथून आंदोलनास सुरूवात होईल. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

Maharashtra Olympic Association
Pune-Jammu Tawi Jhelum Express : झेलम एक्स्प्रेसमध्ये चोरी करणारे तिघे ताब्यात

मतदानासाठी अपात्र संघटना

- कुस्ती, कबड्डी, हँडबॉल, स्विमिंग, बॉक्सिंग, बॉडी बिल्डिंग, नेटबॉल, टग ऑफ वॉर, सायकलिंग, कुराश, मल्लखांब, रोलबॉल, आट्यापाट्या, बॉल बॅडमिंटन, सॉफ्ट बॉल, स्क्वॅश रॅकेट्स, टेनी कोल्ट आदी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news